पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील येरफळे गावाच्या हद्दीत गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर सायंकाळी साडेसातच्या सुमारास विनापरवाना वृक्षतोड करून लाकूड

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील येरफळे गावाच्या हद्दीत गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर सायंकाळी साडेसातच्या सुमारास विनापरवाना वृक्षतोड करून लाकूड ट्रकमध्ये भरत असताना वन विभागाच्या पथकाने धाड टाकत तीनजणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींवर वन गुन्हा नोंद करून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत क्रेनच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे लाकूड ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली होती. त्यावरून वन विभागाच्या अधिकार्यांनी अचानक छापा टाकला असता, घटनास्थळी लाकडाने भरलेला ट्रक व क्रेनसह तीन आरोपी आढळले. या वाहनांत आंबा, ऐन, जांभूळ, पळस, शिरस, रेनट्री आदी प्रजातींच्या 80 लाकडाचे नग (10.688 घमी) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत पवार (रा. कोकिसरे, ता. पाटण), प्रदीप सीताराम कदम (रा. येरफळे, ता. पाटण), नारायण किसन पडवळ (रा. येरफळे, ता. पाटण) या तिघांविरुध्द भारतीय वन कायदेनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ट्रक क्र. एमएच 11 एएल 4021, क्रेन क्र. एमएच 50 एल 6962 ताब्यात घेतले आहे. या कारवाई सातार्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव (वनी व कॅम्प) यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, मल्हारपेठचे वनपाल सर्जेराव ठोंबरे, वनरक्षक संतोष यादव व वनमजूर रमेश कदम यांनी संयुक्तरित्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास वनपाल सर्जेराव ठोंबरे (मल्हारपेठ) हे करत आहेत.

COMMENTS