Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक रिंगणात उमेदवार….

बीड प्रतिनिधी - प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्याला प्रतिसाद

सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात
विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया – छगन भुजबळ
साऊथ अभिनेते जॉनी जोसेफ यांचं निधन

बीड प्रतिनिधी – प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्याला प्रतिसाद देत बीड येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवार दिला आहे तसेच परळी माजलगाव, अंबाजोगाई,केज या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरली असून, पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी या निवडणुकांमध्ये सहभागी झाली आहे, यामुळे या निवडणुकांना रंगत आल्याची चर्चा सुरू आहे, काही ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध होणार होती अशीही परिस्थिती व चर्चा होती परंतु या गोष्टीला आता पूर्णविराम मिळाला आहे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यासाठी आता कामाला लागले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. बीड येथे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, ज्येष्ठ नेते बबन वडमारे,दगडुदादा गायकवाड, युनूस शेख, बालाजी जगतकर,अजय सरवदे महिला जिल्हाध्यक्ष अँड.अनिता चक्रे पुष्पाताई तुरूकमारे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS