Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी

महावितरणचा 1 लाखांहून अधिक नागरिकांसोबत थेट संवाद

पुणे ः प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणचे अभियंते, कर्मचार्‍यांनी सुमारे 1

कोपरगावमध्ये अवैध वाळू उपसाप्रकरणी गुन्हा दाखल
कर्मवीर शिक्षणक्षेत्रातील जननायक ः प्राचार्य टी. ई. शेळके
पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना नोटीस

पुणे ः प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणचे अभियंते, कर्मचार्‍यांनी सुमारे 1 लाख 500 ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. यामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त 577 ग्रामपंचायतींसह शहरी भागातील 209 गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, बँका आदींसह गर्दीच्या ठिकाणी माहिती पत्रकांचे वितरण, छोटेखानी सभा, प्रभातफेरी, विविध व्यासपीठांवरून प्रबोधन आदींद्वारे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे महत्व व विविध फायद्यांची माहिती देण्यात आली.

केंद्र शासनाकडून घराच्या छतावरील 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना सुरु आहे. त्यासाठी घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार व दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. तब्बल 25 वर्ष मोफत वीज देणार्‍या या योजनेची माहिती स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात उपस्थित राहून देण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले. त्यानुसार प्रामुख्याने आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमधील 577 ग्रामपंचायतींसह सहकारी बँका, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये आदींच्या कार्यक्रमांमध्ये महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेची माहिती दिली. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 209 गृहनिर्माण सोसायट्या, घरसंकुल, 18 शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील योजनेची माहिती देण्यात आली. पुणे परिमंडलामध्ये या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्यात येत आहे. छतावरील सौर प्रकल्पासाठी महावितरणकडून सौर नेटमीटर देण्यात येत असून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यात येत आहे. तसेच विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होऊन वीजबिल शून्यवत करावे असे आवाहन या जागर मोहिमेत करण्यात आले.

COMMENTS