Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू

मंजूर पाणी पुरवठा योजनेत नवीन विहिर व पाण्याच्या टाकीची जांब ग्रामस्थांची मागणी

शिरूर प्रतिनिधी - मौजे जांब ता. शिरूर कासार जिल्हा बीड या गावासाठी जलजीवन योजने अंतर्गत उथळा तलाव तागडगाव यामधून पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आ

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ शेतकरी बसले आमरण उपोषणाला
जरांगेंच्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा
पागोरी पिंपळगावातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

शिरूर प्रतिनिधी – मौजे जांब ता. शिरूर कासार जिल्हा बीड या गावासाठी जलजीवन योजने अंतर्गत उथळा तलाव तागडगाव यामधून पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे तरी अंदाजपत्रकात विहीर दाखविण्यात आलेली नाही व पाण्याची टाकी ही दाखवण्यात आलेली नाही तसेच जांब गावाच्या नदीमुळे गावाचे दोन भाग झालेले आहेत. पूर्वेस पश्चिमेस अंदाजपत्रकातील नकाशामध्ये पूर्व भागास पाईपलाईन (वितरिका)दाखविण्यात आलेली नाही. तरी सन 2012 मध्ये गावासाठी एक योजना झालेली होती त्या योजनेमध्ये  तलावात विहीर खोदलेली आहे. त्या विहिरीत पावसाळ्यात सुद्धा पाणी नसते व जमिनीवरील एक टाकी झालेली आहे परंतु संबंधित टाकी पासून गावातील काही वस्त्या एक ते दीड कि.मी.अंतरावर आहेत.त्यामधून संबंधित लोकांना कसे पाणी मिळेल जलजीवन योजनेचा सर्वे ग्रामपंचायत ने रोडने दाखविला होता परंतु अंदाजपत्रकात खाजगी जमिनीतून दाखवण्यात आलेला आहे.तरी सर्व जांब ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मार्फत दिनांक 01/05/2023 ला सि ओ बीड व पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड यांना याबाबतची सर्व माहिती निवेदनाद्वारे कळविण्यात आलेली आहे तरी आत्तापर्यंत यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे  सर्व जांब ग्रामस्थ जांब गावचे सरपंच व सदस्य या मागणीसाठी दिनांक 28/05/2023 पासून जांब गावातील ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत. सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की सदरील पाणीपुरवठा योजनेत दुरुस्ती करून त्यामध्ये नवीन विहीर व भीम कॉलमची टाकी झाली नाही तर आत्ताच्या अंदाजपत्रका नुसार जी योजना राबवली जाणार आहे त्या योजनेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही व संपूर्ण जांब व जांब गावातील वस्त्यास पाणी मिळणार नाही त्यामुळे मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीची मागणी ही प्रशासनाने तात्काळ मान्य करण्यात यावी अशी मागणी समस्त  जांब गावातील गावकर्‍यांनी उपोषणाच्या माध्यमातून केलेली आहे.

COMMENTS