Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसाहित्य देशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते : डॉ. कदम

कर्जत : लोकसाहित्य, लोककला व लोकपरंपरा या कोणत्याही एका जाती, धर्म किंवा पंथापुरत्या मर्यादित नसून त्या संपूर्ण देशाच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांच्या मागे श्रमसंस्कृती, शेती आणि सामाजिक आचार यांचा सखोल इतिहास दडलेला आहे. त्यामुळे देशाची सांस्कृतिक ओळख समजून घेण्यासाठी लोकसाहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभुर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मराठी, हिंदी व इंग्रजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने “आधुनिक परिस्थितीत लोककला, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती : आव्हाने आणि संधी” तसेच वाणिज्य, अर्थशास्त्र व बी.बी.ए. (सीए) विभागांतर्गत “विकसित भारत २०४७ : शाश्वत व सर्वसमावेशक विकास” या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते. डॉ. कदम यांनी नवरात्र, विवाहविधी, लोकश्रद्धा व शेती संस्कृती यांमधील ऐतिहासिक संदर्भ उलगडून सांगत, कोणतीही परंपरा टाकाऊ नसून तिच्यामागे सामाजिक व ऐतिहासिक कारणे असतात, असे स्पष्ट केले. परिषदेचे विदेशी प्रमुख पाहुणे डॉ. जॉर्डन लूम यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व क्षेत्रांत समन्वय गरजेचा असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रवळगावला बससेवा सुरू
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान
कर्जतमध्ये युवकाचा निर्घृण खून

कर्जत : लोकसाहित्य, लोककला व लोकपरंपरा या कोणत्याही एका जाती, धर्म किंवा पंथापुरत्या मर्यादित नसून त्या संपूर्ण देशाच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांच्या मागे श्रमसंस्कृती, शेती आणि सामाजिक आचार यांचा सखोल इतिहास दडलेला आहे. त्यामुळे देशाची सांस्कृतिक ओळख समजून घेण्यासाठी लोकसाहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभुर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मराठी, हिंदी व इंग्रजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने “आधुनिक परिस्थितीत लोककला, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती : आव्हाने आणि संधी” तसेच वाणिज्य, अर्थशास्त्र व बी.बी.ए. (सीए) विभागांतर्गत “विकसित भारत २०४७ : शाश्वत व सर्वसमावेशक विकास” या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.

डॉ. कदम यांनी नवरात्र, विवाहविधी, लोकश्रद्धा व शेती संस्कृती यांमधील ऐतिहासिक संदर्भ उलगडून सांगत, कोणतीही परंपरा टाकाऊ नसून तिच्यामागे सामाजिक व ऐतिहासिक कारणे असतात, असे स्पष्ट केले.

परिषदेचे विदेशी प्रमुख पाहुणे डॉ. जॉर्डन लूम यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व क्षेत्रांत समन्वय गरजेचा असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS