Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सातारा / प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या

एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?
ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला शेतकर्‍यांच्या लुटीसाठी; 1 डिसेंबरला राजारामबापू कारखान्यात काटा बंद आंदोलन
सकारात्मक विचारसरणी हीच आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा चंद्रकांत उकिरडे

सातारा / प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही पुष्पहार अपर्ण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केले.
मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
पुष्पवृष्टी झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पोलीस बॅण्ड पथकाने मानवंदना दिली.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील पाटण घडविण्यासाठी कटीबध्द आहे. त्यांनी सर्वसमान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पाटण तालुक्याचा विकास केला. त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच मी काम करत आहे. पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS