Homeताज्या बातम्यादेश

गुजरातसह मध्यप्रदेशात पूरसदृश्य परिस्थिती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरूवात झाली असून, गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश आणि

एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षेत नासाकाचा १०० टक्के निकाल 
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
भीमा कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरूवात झाली असून, गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे दोन्ही राज्यांतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुजरात आणि मध्य प्रदेशमधील अनेक भागांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. आसपासच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये मुसळधार पावसामुळे वानाकबोरी धरणं ओसंडून वाहत आह. त्यामुळे परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशात चंबळ आणि शिप्रा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. तर रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य प्रदेशात पावसानं हाहाकार माजवला आहे. रतलाम विभागातील झाबुआ जिल्ह्यातून जाणार्‍या दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील रूळाचा भाग खचला आहे. रेल्वेवाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. डाउन मार्गावरील रेल्वेगाड्या कासवगतीने जात आहेत. खचलेला भागात भराव आणि ट्रॅकचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. 300 मजुरांसह अधिकारी हे काम करत आहेत. मध्य प्रदेशासह गुजरातमध्येही पावसानं थैमान घातले आहे. भरूचमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

COMMENTS