Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकबाकीमुक्त शेतकर्‍याला ध्वजारोहणाचा मान; महावितरण लोणंद उपविभागाचे पाऊल

सातारा / प्रतिनिधी : शेतकर्‍यांना विजेच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी शासनाने आणलेल्या ‘कृषी धोरण-2020’ ला शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. थकबाकी

आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
 कांद्याला भाव द्या ; शेतकऱ्यांची आर्त हाक
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

सातारा / प्रतिनिधी : शेतकर्‍यांना विजेच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी शासनाने आणलेल्या ‘कृषी धोरण-2020’ ला शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. थकबाकीमुक्तीच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या सरपंचापर्यंत संवाद साधला आहे. थकबाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचा प्रतिकात्मक सन्मान म्हणून महावितरणच्या लोणंद उपविभागाने थकबाकीमुक्त शेतकर्‍याला प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा सन्मान दिला आहे.
शेती आणि शेतकर्‍याच्या दृष्टीने वीज ही अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र, वापरलेल्या विजेचे बील भरण्याला शेतकर्‍यांची अनास्था आहे. इतर सेवांप्रमाणे विजेच्या सेवेचे बील भरणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी लोणंद उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांनी ध्वजारोहणाचा मान आरडगाव येथील शेतकरी लालासाहेब भोईटे यांना दिला. भोईटे यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी व चालू बिलापोटी 117860 रुपयांचे भरले आहेत. खेड बु। येथील रामचंद्र शेळके यांनी 61000 व मरीआईचीवाडी येथील अशोक रासकर यांनी 49670 रुपये कृषी वीजबिल भरुन आपले कर्तव्य पार पाडले. या दोघांनाही प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे पदाचा मान मिळाला.
‘कृषी धोरणा’तून शेतकर्‍यांना दंड, व्याजाची माफी मिळाली आहे. ज्यांच्या बिलाबाबत तक्रारी होत्या. त्याचीही दुरुस्ती करुन आलेल्या सुधारित थकबाकीपैकी केवळ 50 टक्के व सप्टेंबर 2020 पासूनचे संपूर्ण चालूबिल इतकीच रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे. लोणंद उपविभागातील 4667 शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेत 7 कोटी 30 लाखांहून अधिक रक्कम भरली आहे. या शेतकर्‍यांना 6 कोटी 71 लाखांची माफी मिळाली आहे. शिवाय भरलेल्या रकमेतून गावातील व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी 66 टक्के निधी उपलब्ध झाल्याने विजेच्या समस्या निकाली निघत आहेत.
इतर शेतकर्‍यांनीही कृषी धोरणांतर्गत थकबाकी व चालूबिल भरुन आपले कर्तव्य पार पाडावे, महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांनी ध्वजारोहणप्रसंगी केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक व उपविभागातील वीज कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS