Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ललिता सातव यांच्या हस्ते ध्वजारोहण

राहाता ः तालुक्यातील एकरुखे गावामध्ये हर घर तिरंगा या मोहिम अंतर्गत एकरुखे नं 2 सोसायटी येथे प्रथम दिवसाचा ध्वजारोहण नवनिर्वाचित पीएसआय कु. ललिता

कुळधरणच्या पालखी उत्सवात भाविकांची गर्दी
गौतम स्कूलच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा

राहाता ः तालुक्यातील एकरुखे गावामध्ये हर घर तिरंगा या मोहिम अंतर्गत एकरुखे नं 2 सोसायटी येथे प्रथम दिवसाचा ध्वजारोहण नवनिर्वाचित पीएसआय कु. ललिता विजय सातव यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानिमित्त त्यांचा एकरुखे नंबर 2 सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर, सोसायटीचे चेअरमन रविंद्र पगारे, व्हॉ चेअरमन रामभाऊ जाधव व सर्व सोसायटी संचालक तसेच गणेश कारखान्याचे अकाउंटंट रमेश काका आग्रे, गणेश थोरात, भानुदास सातव, दीपक अग्रे, जितेंद्र सातव, प्रसाद भवर, बाळासाहेब बोर्डे, धोंडीराम सातव, दत्तात्रेय सातव, राजेंद्र आग्रे, विजय सातव,जगनाथ भवर,अरुण कारले आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS