पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द

एसटी महामंडळाचा निर्णय

मुंबई प्रतिनिधी:- गेल्यावर्षी एसटी कर्मचार्‍यांचा झालेला संप आणि चालकांची असलेली वाणवा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा न

गर्दी टाळणारे निर्बंध घातले, शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही : मुख्यमंत्री
हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी
पुण्यात हॉटेलची तोडफोड करत लुटले

मुंबई प्रतिनिधी:- गेल्यावर्षी एसटी कर्मचार्‍यांचा झालेला संप आणि चालकांची असलेली वाणवा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेर ही योजना रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने रविवारी घेतला.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासाठी संप कर्मचार्‍यांनी सुरु केला होता. मात्र हा संप चांगलाच लांबला, आणि प्रवाशांचे हाल होत होते. एकीकडे चर्चा सुुरु असतांना, महामंडळ संप मोडीत काढण्यासाठी देखील प्रयत्नशील होते. कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिकसह अन्य काही विभागात ही समस्या असून यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठी जून 2022 पासून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मात्र, संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली. मुदत संपल्याने काही चालकांना मुदतवाढही देण्यात आली. मात्र, महामंडळाला आणखी चालकांची गरज भासत होती. काही चालकांची अन्य विभागात बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षानंतर अनेकांनी पुन्हा आपल्याच भागात बदली करून घेतल्याने मनुष्यबळाची असमतोल उपलब्धता आहे. चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या राहतात. परिणामी, प्रवाशांचे हाल होतात दरम्यान 2016-17 व 2019 मध्ये राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या चालक कम वाहक संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रियेला करोना काळात तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. संप काळातही हे काम थांबले. स्थगिती उठवल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. मात्र नियुक्ती न झाल्याने एसटी महामंडळाकडे उमेदवार विचारणा करत होते. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS