Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओगदी शाळेचे पाच विद्यार्थी प्रथम

राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत मिळवले यश

कोपरगाव शहर : शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण जागृती हीच आपली खरी संपत्ती व संस्कृती या म्हणीप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खोंदला येथी

गर्भपाताच्या गोळ्यांमुळे युवतीचा झाला मृत्यू. गुन्हा दाखल
वेताळबाबा यांच्या प्रतिमेस चांदीचा मुकुट मुकुट अर्पण
Sushant Singh Rajput Case मध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार | ‘Filmi Masala’ | LokNews24

कोपरगाव शहर : शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण जागृती हीच आपली खरी संपत्ती व संस्कृती या म्हणीप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खोंदला येथील राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने मी ज्ञानी होणार या टॅगलाईनने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील ओगदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
या राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा परीक्षेत राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात 18 विद्यार्थी प्रथम आले असून त्यात ओगदी जिल्हा परिषद शाळेतील अंजली गंगाराम गोणटे, अनुराधा माधव सोनवणे, गीता दशरथ जोरवर, वैष्णवी जगन्नाथ जोरवर व रोहन दयानंद सोनवणे या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच येवला येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील टोरपे, शालेय शिक्षक बाळासाहेब गुंजाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कोल्हे, दशरथ जोरवर, जगन्नाथ जोरवर, दयानंद सोनवणे, विजय बेंडके आदि ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS