Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुंदरम फायनान्सची पठाणी पद्धतीने वसुली सुरू

अधिकार्‍याकडून कर्जदारास मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून फायनान्सच्या वसुली अधिकार्‍यांनी सहा ते सात सहकार्‍यांच्या मदतीने कर्जदारास शिवीगाळ दमदाटी

बेलापूर महाविद्यालयात चित्रपट निर्मिती कार्यशाळा उत्साहात
बेलापुरात वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे पकडले
ट्रामा केअर सेन्टर आज उभे असते तर परिस्थिती काहीशी वेगळी असती- कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून फायनान्सच्या वसुली अधिकार्‍यांनी सहा ते सात सहकार्‍यांच्या मदतीने कर्जदारास शिवीगाळ दमदाटी करीत कर्जाच्या त्याची मागणी करून हाताच्या चापटीने काम करून कर्जदाराची चार चाकी वाहन बळजबरीने ताब्यात घेतले. ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव परिसरातील हॉटेल नील जवळ घडली.
याबाबतची माहिती अशी की भगवान भाऊसाहेब मुळे (राहणार ज्ञानेश्‍वरनगर,औरंगाबाद) यांनी सुंदरम फायनान्सकडून चार चाकी वाहनाकरिता कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे काही हफ्ते थकल्याने फायनान्सने त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्याची मागणी केली. यावर मुळे यांनी कर्जाचे हप्ते लवकरच देतो असे सांगितले. भगवान मुळे हे त्यांच्या मित्रासह त्यांची चार चाकी मारुती स्विफ्ट कार (क्रमांक एम एच 20 डीजे 71 69) मधून नगर पुणे रोडने जात असताना हॉटेल निल जवळील खाण्याचे पान दुकानावर पान घेण्याकरिता थांबले असता तेथे सात ते आठ अनोळखी इसम आले त्यापैकी एकाने मी सुंदरम फायनान्सचा प्रतिनिधी दिनेश डेमला आहे, असे सांगून त्याचे ओळखपत्र दाखविले. व कर्जाची थकबाकी असल्याचे सांगून त्वरित हप्ते आमच्याकडे जमा करा असे म्हटले. यावर मुळे यांनी सध्या माझ्याकडे पैसे नाही, मी आता हप्ता देऊ शकत नाही असे म्हटल्याचा राग आल्याने दिनेश डेमला व त्याच्या साथीदारांनी मुळे यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत हाताने मारहाण केली. आणि त्यांची मारुती स्विफ्ट कार बळजबरीने ताब्यात घेऊन निघून गेले. या दरम्यान मुळे यांचे पैशाची पाकीट गहाळ झाले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भगवान मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश डेमला व त्याचे सात ते आठ-सातजणा विरूद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 143 147 149 323 504 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस नाईक खोमणे करीत आहे.

COMMENTS