Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालाघाटवर पाच प.स. गणातील मतदारांचा एकमुखी पाठिंबा

मतदारच माझा राजकीय पक्ष - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - प्रत्येक निवडणुकीत मतदार हा राजा असतो आणि मतदारांचा विश्वास हाच उमेदवारांचा यशाचा पाया असतो माझ्या यशाचा पाया म्हणजेच माझा मतदार

राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखले
कपाटाची चावी बनवून देणाराने दोन तोळ्याचे दागिने नेले चोरून
सिन्नर तालुक्यात स्कॉर्पिओचा भीषण अपघात

बीड प्रतिनिधी – प्रत्येक निवडणुकीत मतदार हा राजा असतो आणि मतदारांचा विश्वास हाच उमेदवारांचा यशाचा पाया असतो माझ्या यशाचा पाया म्हणजेच माझा मतदार आहे, बालाघाट वरचा आणि बीड मतदार संघातील मतदार हाच माझा पक्ष असून या निवडणुकीमध्ये हाच मतदार पुन्हा एकदा पाठिंबा देणार असून मोठ्या मताधिक्याने शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून येतील असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निवडणुक 2023 च्या शेतकरी विकास पॅनल आयोजित येळंब, मांजरसुंबा, नेकनुर, लिंबागणेश, पाली या सर्कल मधील मतदारांचा मेळावा मांजरसुंबा येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी युवानेते डॉ योगेश क्षीरसागर, बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, श्रीमंत जायभाये, लाला पाटील चौरे, अश्रूबा रसाळ, माजी नगरसेवक सुभाष सपकाळ, निवृत्ती डोके, दूध संघाचे अध्यक्ष तानाजी कदम, सुग्रीव रसाळ, अ‍ॅड.दत्ता डोईफोडे, उपाध्यक्ष मनोज पाठक, अ‍ॅड.भालचंद्र भंडाणे, नवनाथ कुलकर्णी, माजी नगरसेवक विलास विधाते, संचालक सर्जेराव खटाणे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. या  मेळाव्यास येळंब, नेकनुर, मांजरसुंबा, लिंबागणेश, पाली या सर्कल मधील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, हमाल-मापाडी, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकशाही बळकट व मजबूत करण्याचे काम निवडणुकांच्या माध्यमातून होत असते महत्त्वाची भूमिका घेऊन आपण या निवडणुकीत पुढे आलो आहोत, सत्ता मिळाली की खूप कल्याण झाले या भावनेतून आपण कधी निवडणुकांकडे पाहिले नाही सत्ता हे साधन आहे याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा हा उदात्त हेतू ठेवूनच सहकाराच्या माध्यमातून जे यश मिळत आहे ते फक्त आपल्यासारख्या मतदारांच्या सहकार्यातूनच त्यामुळेच तिन्ही संस्था राज्यात एक क्रमांक मिळवत काम करत आहेत त्याचप्रमाणे बाजार समिती देखील सक्षमपणे कसे काम करेल यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. बीड जिल्ह्यातून बेंगलोर सारख्या लांब ठिकाणी रेशीम कोष जात होता परंतु त्यासाठी आपण बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांना इथेच खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतीचे ग्राहक ही चैन तयार करून शेतकर्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. लोकशाहीत मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण या तीनही संस्थांच्या निवडणुकात विरोधकांना एकही उमेदवार मिळाला नाही त्यामुळे तिन्ही संस्था बिनविरोध निवडून आले आहेत. आम्हालाही पैसा खाता आला असता पण अशी पद्धत किंवा आयुष्यात बट्टा आणि बाट कधी लागून घेतला नाही. मांजरसुंबा परिसरात जमेल त्या प्रयत्नातून विकास कामे केली आहेत गवारी या ठिकाणी 200 केव्ही सब स्टेशन उभारले आहे, या परिसरात लहान मोठे तलाव आणि प्रकल्प आजही काळ्या आईची तहान भागवत आहेत, ही कामे होत असताना छापण्याची नामी संधी होती पण ती नीती आणि विचारही कधी केला नाही, विरोधक आता फक्त छपाईच्या नादात आहेत, छापणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, हा छापील ऐवज या तीन चार दिवसात तुमच्याकडे येईलच पण नंतर त्याची दसपट वसुली सुरू होईल त्यामुळे सावध रहा, भविष्यातील निवडणुकांची ही दिशा ठरवणारी निवडणूक आहे सगळ्या ऋतूत संरक्षण देणारी छत्रीच आता आपल्या कामी येणार आहे असे म्हणतात. उपस्थित बालाघाट वरच्या मतदारांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना एकमुखी पाठिंबा देऊन विजयी करण्याचे संकेत दिले. या मेळाव्यास पाच पंचायत समिती गणातील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जगदीश काळे, डॉ योगेश क्षीरसागर, दिनकर कदम तानाजी कदम आदींनीही मनोगत व्यक्त केले.

COMMENTS