Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास

गोंदवले / वार्ताहर : गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवर सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दोन अनोळखी इसमांनी मनीषा बाळकृष्ण शिलवंत यांच्या ज

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी वेगाने सुरू; वारकर्‍यांच्या सोयी-सुविधांची कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करावीत : शेखर सिंह
25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून
मसूरच्या स्मशानभूमिची अज्ञाताकडून तोडफोड

गोंदवले / वार्ताहर : गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवर सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दोन अनोळखी इसमांनी मनीषा बाळकृष्ण शिलवंत यांच्या जवळील पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. याबाबतची फिर्याद त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली.
सातारा-पंढरपूर रोडवर गोंदवले खुर्द येथे शिलवंत वस्ती आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लाल रंगाच्या मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात 2 इसमांनी त्यांच्या घरासमोर थांबून घरात कोण आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी मनीषा शिलवंत ह्या घरी होत्या. त्यांना संशयितांनी तुमच्याकडील तांब्या-पितळी वस्तूसह सोन्या-चांदीचे दागिन पॉलिश करून देतो असे सांगितले. खात्रीसाठी संशयितांनी एक पितळेचा-तांब्या पॉलिश करून दाखविला. शिलवंत यांचा विश्‍वास बसल्यानंतर इतरही वस्तूंना पॉलिश केले. त्यानंतर शिलवंत यांनी माझ्याकडे असलेले सोने तुम्ही पॉलिश करून देऊ शकता का? अशी विचारणा केली. त्यांनी तात्काळ हो म्हणताच शिलवंत यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने संशयितांकडे पॉलिश करण्यासाठी दिले. संशयितांनी हातचलाखी करून सोन्याचे त्यांच्या समोर जवळील भांड्यात टाकले. त्यांना पाणी पाठवून हातचलाखीने दागिने काढून घेतले. तसेच या मिश्रणात टाकलेले दागिने अर्ध्या तासाने तुमचे सोने पॉलिश होतील, असे सांगून संशयितांनी पलायन केले. अर्ध्या तासाने पाहिले असता त्यामध्ये सोने नव्हते. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्यास लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. याप्रकरणी शिलवंत यांनी दहिवडी पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार संशयिताविरोधात 1 लाख 88 हजार 260 रुपये किमतीचे पाच तोळे सोने चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि तासगांवकर करत आहेत.

COMMENTS