पाचशे टन वजनाचा पूल चोरीला !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पाचशे टन वजनाचा पूल चोरीला !

    एका मराठी चित्रपटात शेतातील विहीर चोरीला गेल्याचे कथानक पूर्णतः काल्पनिक असावं, अशी वाटले होते. परंतु, कथानकाची एकूण गुंफन अशी होती की, सरकारी बा

पश्चात्ताप अहंगडाचा!
भीषण अपघात…दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी | LOKNews24
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

    एका मराठी चित्रपटात शेतातील विहीर चोरीला गेल्याचे कथानक पूर्णतः काल्पनिक असावं, अशी वाटले होते. परंतु, कथानकाची एकूण गुंफन अशी होती की, सरकारी बाबूंच्या करामतीला वैतागलेला तरूण शेतकरी शेवटी सर्वकाही करून अनुदानातून मिळालेल्या विहीरीचे बांधकाम न करता भ्रष्ट अधिकाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी विहीरच चोरीला गेल्याचे सांगतो. ही कथा आज आठवण्याचे कारण असे की, या काल्पनिक कथेला साजेशी परंतु, प्रत्यक्षा सत्य असलेली घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या पटना या राजधानीच्या शहरापासून अवघ्या दिडशे किमी वर असलेल्या अमियावर या लहानशा खेड्यात ही घडना घडली आहे. या गावातील एका कालव्यावर साठ फूट लांबीचा पाचशे टन लोखंडाचा बनलेला पूल अचानक चोरीला गेला. पंचेचाळीस वर्षांपूर्वी राज्याच्या सिंचन विभागाने उभारलेला हा पूल ८ एप्रिल पर्यंत अबाधित होता, असे गावच्या लोकांनी सांगितले. गावापासून काही अंतरावर असलेला हा लोखंडी पूल गावकऱ्यांच्या फारसा वापरात नव्हता. परंतु, शेतात जाता – येताना लोकांना तो सहज नजरेस पडायचा. मात्र, ९ एप्रिल ला हा पूल चक्क गायब झाला म्हणजे चोरीला गेला, असे गावाचे प्रत्यक्षदर्शी सांगताहेत. गावातील काही लोकांनी अवाढव्य गॅस कटर्स, जेसीबी सारख्या मशिनरी घेऊन आलेल्या लोकांनी काही वेळातच हा संपूर्ण पूल तोडून मोठमोठ्या मालवाहू ट्रक मधून तोडलेल्या लोखंडी पूलाला वाहून नेले. आता गावच्या लोकांचे म्हणणे आहे, की, पूल चोरून नेणारे अन्य इतर कोणी नसून सिंचन विभागाचे सरकारी अधिकाऱ्यांनीच हा पूल चोरी करून नेऊन विकून टाकल्याची तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील कथानकात येणाऱ्या घटनाक्रमालाही लाजवणारे हे वास्तव एक प्रकारे अराजक व्यवस्थेची क्रियाशिलता दिवसेंदिवस कशी वाढत चालली आहे, याची निदर्शक आहे. सरकारी मालकीची कोणतीही वस्तू खासकरून लोखंडाच्या वस्तू भंगार बाजारातील व्यापारी देखील योग्य प्रोसेस किंवा कार्यवाही शिवाय विकत घेऊ शकत नाही. परंतु, पाचशे टन लोखंडाचा हा पूल अवघ्या काही वेळात चोरून नेऊन त्याची विक्री देखील केली गेली, याचा अर्थ या पूलाला चोरून नेण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया घडेपर्यंत बाजारातील खरेदीदार फिक्स करून घेतला गेला आहे. त्यानंतर उर्वरित सर्व कार्यभाग उरकला गेला आहे, असे स्पष्ट दिसते. अर्थात, सरकारी अधिकारी एवढी मजल मारण्याची हिंमत करित नाही. परंतु, अलिकडे घडणाऱ्या काही धक्कादायक बाबी पाहून, ऐकून, वाचून मन सुन्न होते. गेल्या वर्षी युरोपसह जगभरात तुफान पाऊस झाल्याने अनेक देशांमध्ये मोठमोठे पूल वाहून गेल्याचे फोटो आपण अनेक बातम्यांमधून पाहीले होते. जागतिक हवामान बदलत असल्याने नैसर्गिक घटनाक्रमाने योग्य तंत्रज्ञान वापरून बनविलेले पूल केवळ धारातिर्थी पडले नाहीत, तर अक्षरशः वाहून गेल्याचे आपणांस फारसे नवल वाटले नव्हते. कारण, जागतिक पातळीवर बदललेल्या हवामानामुळे ऊन-वारा-पावसाचा होणारा अतिरेक आता अंगवळणी होत चालला आहे. परंतु, माणसाने बांधलेल्या किंवा निर्माण केलेल्या वास्तु किंवा वस्तू सहजपणे चोरीला जात असतील अशी घटना, मानवी जीवन हे एक्स्ट्रीम होत चालले आहे, याची साक्ष ठरेल. कोणत्याही गोष्टीतील एक्स्ट्रीमपणा हा मानवी जीवनात घातकच आहे. सरकारी विभागांत नोकरी करताना थेट पूलच चोरून न्यायचा ही अतिरेक ठरणारी कल्पना सुरूवातीला एखाद्याच्या डोक्यात आली असेल. त्यातून इतरांना कन्व्हिन्स करून प्रत्यक्षात साकारली गेली आहे. एवढा मोठा पूल गावापासून काही अंतरावरून चोरून नेत असताना गावाला त्याचा साधा आवाजही येऊ नये, ही चोरून नेण्याइतकीच धक्कादायक बाब आहे. आता चोरून नेलेला पूल गावकऱ्यांना पुन्हा बनवून मिळेल की नाही, हा प्रश्न अधांतरीच राहणार!

COMMENTS