Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथील उपजिल्हा रुग्णालयास फिटल डापलर भेट

केज प्रतिनिधी - स्व.नानाभाऊ उगलमुगले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमती सविता ऊगलमुगले यांनी येथील केज येथील उपजिल्हा रुग्णालयास फिटल डापलर

पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र
यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार

केज प्रतिनिधी – स्व.नानाभाऊ उगलमुगले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमती सविता ऊगलमुगले यांनी येथील केज येथील उपजिल्हा रुग्णालयास फिटल डापलर नवजात शिशुच्या ह्रदयाचे ठोके मोजण्याचे यंत्र भेट म्हणून दिले आहे.या पुर्वीही सक्शन मशीन व नेब्युलायझर वाढदिवसा च्या निमित्ताने दिले होते तसेच तिसर्‍या वर्षीही वडलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असणार्‍या वस्तु देण्याचे ठरवलेले दान देत आहे असे सांगितले. त्यांच्या वडिलांच्या आठवणी मधे अशा आवश्यक वस्तु सरकारी दवाखान्यात देणे यासारखे चांगले कार्य दुसरे कायअसणार ? याचा लाभ डॉक्टरांना नवजात बालकाच्या ह्रदयाचे ठोके मोजण्या साठी होईलअसेउपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. बालासाहेब सोळंके यांनी सांगितले आहे.यावेळी डॉ. विशाल करपे,श्रीकृष्ण नागरगोजे,यादव विजयकुमार ,श्रीमती सविता ऊगलमुगले , अजय लाटे,पत्रकार धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS