मुंबई प्रतिनिधी - महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने
मुंबई प्रतिनिधी – महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहेत. बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघामधून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांचा दबदबा असलेल्या मावळ मतदारसंघामधून उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात संजोग वाघेरे पाटील यांना उतरवण्यात आलं आहे. सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोलीतून नागेश पाटील-अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
संभाजीनगर हा उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली जाणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार याबद्दल चर्चा होत्या. अखेर या मतदारसंघातील उमेदवाराचं नावाच्या चर्चेला पहिल्याच यादीत पूर्णविराम लावत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. धाराशीवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंच्या पक्षाची मशाल घेऊन उतरणार आहेत. नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गितेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीसहीत ठाकरे गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीतील 16 उमेदवारांसहीत संजय राऊतांनी 17 वं नाव सोशल मीडियावरुन जाहीर केलं आहे. यादीमध्ये 16 नावं असली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.’ एकूण 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
यादी खालीलप्रमाणे –
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड- अनंत गिते
सिंधुदुर्ग, रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई, ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई, दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई, वायव्य- अमोल कीर्तिकर
मुंबई, दक्षिण मध्य – अनिल देसाईं
परभणी- संजय जाधव
COMMENTS