Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुना मोंढा भागात सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार 

गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

  नांदेड प्रतिनिधी - जुन्या वादातून जुना मोंढा भागातील शारदा टॉकीज रस्त्यावर एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सराफा व्यापारी जखमी झा

संसद भवनात एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनी गैरहजर
देवळाली प्रवरात ’वीरो को वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन

  नांदेड प्रतिनिधी – जुन्या वादातून जुना मोंढा भागातील शारदा टॉकीज रस्त्यावर एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सराफा व्यापारी जखमी झाला असून पोलिसांनी गोळीबार करणा-यास अटक केली आहे. शारदा टॉकीजसमोर पाठक गली भागातील सराफा व्यापारी सचिन पंढरीनाथ कुलथे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आरोपी गजानन बालाजी मामीडवार याने दुचाकीवर येऊन ही फायरिंग केली. यात सचिन कुलथे याच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, उस्म ननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, मुदखेडचे राजू वटाणे, वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे एपीआय संजय निलपत्रेवार आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून जखमीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून फायरिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सचिन कुलधे हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी याठिकाणी आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सचिन कुलधे याच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS