Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार

1 गोळी पोटात लागलेल्या तरूणावर उपचार सुरू

पुणे ः सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून आवुर्जन उल्लेख करण्यात येत असलेल्या पुणे शहरात आता गुंडांची हैदोस वाढतांना दिसून येत आहे.

आलिया-रणबीरची मुलगी लाडकी लेक कॅमेऱ्यात कैद
नस दाबणारा प्रतिनिधी आणि जागलेला महात्मा!
आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे : पंतप्रधान मोदी

पुणे ः सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून आवुर्जन उल्लेख करण्यात येत असलेल्या पुणे शहरात आता गुंडांची हैदोस वाढतांना दिसून येत आहे. कोयत्या गँगच्या दहशतीनंतर आता गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या दिवशी गोळीबाराची घटना समोर आली आहे. शुक्रवारी  पहाटे शहरातील येरवडा परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो जबर जखमी झाला. गत 4 दिवसांतील गोळीबाराची ही चौथी घटना आहे. यामुळे नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विकी चंदाले ( रा. येरवडा, पुणे) नामक तरुणावर शुक्रवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झाला. आकाश चंदाले नामक आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आकाश व विकी हे एकमेकांना चांगले ओळखतात. त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसान गोळीबारात झालेत. आरोपी आकाश चंदाले याने स्वतःच्या पिस्तुलातून विकी चंदाले याच्यावर 3 गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी विकी चंदाले याला लागली. त्यात तो जबर जखमी झाला. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी आकाश घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास येरवड्यातील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. आरोपी व जखमी तरुण एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांच्यात जुना वाद होता असेही या प्रकरणी सांगण्यात येत आहेत. आरोपी आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत. पुण्यातील मागील 4 दिवसांतील गोळीबाराची ही चौथी घटना आहे. जंगली महाराज रोड व हडपसरच्या शेवाळवाडी परिसरात यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर स्विगीचा गणवेष घालून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. त्यानंतर शेवाळवाडीत दोन सैनिकांमध्ये वाद झाल्याने भर रस्त्यात गोळीबार झाला होता.

COMMENTS