Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी बस स्थानकात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

बीड ः बीडच्या परळी शहरात बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
संजीवनीचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम
शेतकर्‍यांचे लाल वादळ मुंबईत धडकणार

बीड ः बीडच्या परळी शहरात बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या परळी बस स्थानकात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्र्याच्या शेडमधून आणि काचांमधून गोळी आरपार गेली. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील बसस्थानकासमोर अज्ञाताने गोळीबार केला. यावेळी दोन गोळ्या हवेत झाडल्या. यादरम्यान ही गोळी पत्र्याच्या शेडमधून आरपार गेल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS