महाराष्ट्रातील सात जणांना ‘अग्निशमन सेवा पदक’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सात जणांना ‘अग्निशमन सेवा पदक’

नवी दिल्ली : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचार्‍यांना ‘अग्निशमन

फुलाई नगर भागातील कालींदेश्वर मंदिराची सर्वेक्षणाची जिल्हाधिकार्‍याकडे मनसेची मागणी
नाफेडच्या सब एजन्सी कडून कांदा खरेदी सुरू
राहुरीत दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नवी दिल्ली : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचार्‍यांना ‘अग्निशमन सेवा पदके’ जाहीर झाली आहेत. या पुरस्कारांमध्ये नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मराणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील पाच अधिकारी कर्मचार्‍यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.यात मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर,अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे. देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचार्‍यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये 1 ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, शौर्यासाठी 2 ‘अग्निशमन सेवा पदक’, विशिष्ट सेवेसाठी 9 ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ आणि उत्कृष्ट सेवेसाठी 30 ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

COMMENTS