Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड शहरात अग्निशमन गाडी दाखल…भूषण कासलीवाल यांच्या प्रयत्नांना यश… 

चांदवड : मुख्य बाजारपेठ असलेल्या चांदवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या व २०१५ साली चांदवड 'क' वर्ग न

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये
पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगींना जीवे मारण्याची धमकी
कोल्हे साखर कारखान्यातील इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा

चांदवड : मुख्य बाजारपेठ असलेल्या चांदवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या व २०१५ साली चांदवड ‘क’ वर्ग नगरपरिषद होऊनही चांदवड येथे अद्यापपर्यंत अग्निशमन दलच कार्यरत नव्हते. एखादी आगीची घटना घडल्यास चांदवड येथील नॅशनल हायवे सोमा टोल प्लाझा कंपनीच्या अग्निशमन गाडी वाट बघत असणे स्वाभाविक होते.आणि एवढा मोठा तालुका ,चांदवड शहर आणि एक गाडी यामुळे अनेक अडचणींना चांदवडकरांना सामोरे जावे लागत होते. शहरात आगीची एखादी मोठी घटना झाल्यास मनमाड, मालेगाव, पिंपळगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत होते.अनेक घटना घडतात याच पार्श्वभूमीवर माजी प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी वारंवार पाठपुरावा करत चांदवड शहरासाठी नवीन परिपूर्ण अशी अग्निशमन ची गाडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.

दि.24 ऑगस्ट 2023 रोजी अग्निशमन दलाची गाडी चांदवड नगर परिषदेला मिळाले असून आज पर्यंत चांदवड नगर परिषदेकडून व कर्मचारी वर्गाकडून संबंधित कंपनीने प्रात्यक्षिक दाखवून अधिकारी व कर्मचारी वर्गाला गाडी बद्दल संपूर्ण माहिती देत प्रशिक्षण दिले आहे. यावेळी चांदवड परिषद चे प्रथम नागरिक भूषण कासलीवाल यांनी अग्निशमन दलाच्या गाडीचे नारळ अर्पण करून लोकार्पण केले.यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके,नगरपरिषद अधिकारी कर्मचारी व नागरिक उपसथित होते.

आपत्कालीन व्यवस्थेचा विचार करता व चांदवड शहर हे मुंबई आग्रा महामार्ग-03 वर मुख्यबाजारपेठ असलेले शहर असल्याने तसेच चांदवड तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे मी, मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याकडून गाडी आणण्यास सक्षम ठरलो. शासन स्तरावर लवकरच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची भरती होईल व यासाठी देखील मी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. भूषण कासलीवाल –  मा. प्रथम नगराध्यक्ष,चांदवड नगरपरिषद.

चांदवड शहरात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मात्र अग्निशमनगाडी आपत्कालीन वेळेस घेऊन जाणे आवश्यक असते परंतु मी, चांदवड शहराची नैसर्गिक व मानवीकृत वस्तीचा विचार करता प्रत्येक्षात बघितले की, अनेक ठिकाणी गाडी जाणार नाही अशी स्थिती आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत अग्निशमन गाडी, घंटागाडी, पिण्याचे पाण्याची गाडी, ॲम्बुलन्स, ट्रॅक्टर व इतर वाहने आरामशीर जातील व परततील या पद्धतीने रस्ता खुला करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे.  रमाकांत डाके – मुख्याधिकारी तथा प्रशासक, चांदवड नगरपरिषद

COMMENTS