Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी

गोंदवले / वार्ताहर : येथील सातारा-लातूर महामार्गालगत असलेल्या संतोषी स्टील फर्निचर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक या दुकानाला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भ

सातारा नगराध्यक्षांच्या बोटचेप्या धोरणामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार रखडला : अमोल मोहिते यांचा आरोप
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
फलटणमध्ये भर दिवसा 50 हजाराची रोकड लंपास

गोंदवले / वार्ताहर : येथील सातारा-लातूर महामार्गालगत असलेल्या संतोषी स्टील फर्निचर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक या दुकानाला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे चारजण किरकोळ जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला या दुकानाला आग लागली. या दुकानाला लागून राहत असलेल्या नवले कुटुंबाच्या निदर्शनास ही घटना आली. त्यावेळी दौलत नवले यांनी दुकान मालक नामदेव भिंगारे यांना हाका मारून बोलावले. त्यानंतर दुकानाचे शटर उघडले असता, दुकानाच्या समोरील भागात भीषण आग लागल्याचे दिसले. लोकांच्या आरडाओरड्याने परिसरातील इतर लोकांनीही घटनास्थळी धाव घेतली. दुकानाशेजारील हातपंपाचे पाणी उपसून लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती.
त्यामुळे गावातून ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी यांना फोन करून त्यांचा पाण्याचा खासगी टँकर बोलवण्यात आला. त्यानंतर बर्‍याच वेळाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दुकानातील विद्युत इन्व्हर्टरसाठीच्या बॅटर्‍या फुटल्या. तसेच दुकानातील इतर फर्निचर व माल जाळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे समजताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती. दरम्यान, दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मालक नामदेव भिंगारे व ज्ञानेश्‍वर भिंगारे यांच्यासह त्यांची मुले आग आटोक्यात आणताना किरकोळ जखमी झाली आहेत.

COMMENTS