Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलुंडमध्ये व्यवसायिक इमारतीला आग

मुंबई : मुलुंड पश्‍चिमेकडील अविअर कॉर्पोरेट पार्क या व्यावसायिक इमारतीला मंगळवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या 40 ते 50 जण

उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.
रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचा एक सामाजिक उपक्रम
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार

मुंबई : मुलुंड पश्‍चिमेकडील अविअर कॉर्पोरेट पार्क या व्यावसायिक इमारतीला मंगळवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या 40 ते 50 जणांची सुटका करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मुलुंड पश्‍चिमेकडे एलबीएस मार्गावरील एका व्यावसायिक इमारतीत अचानक आग लागली. सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. एकूण 1000 चौरस मीटर जागेत ही आग पसरली होती. विद्युत यंत्रणा, विद्युत वाहिन्या, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी सामान, कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा दाखल आहे. आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असून कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

COMMENTS