Homeताज्या बातम्यादेश

हाजरा मेमोरियल हॉस्पिटलला आग

डॉक्टर दांपत्यासह 6 जणांचा मृत्यू

झारखंड प्रतिनिधी - झारखंडच्या धनबाद येथे पुराना बाजार परिसरात असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना झाली असून या

पवन खेरा अटकेचा अन्वयार्थ ! 
पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका
कांद्यानंतर आता साखरेवर निर्यातबंदीचे संकेत

झारखंड प्रतिनिधी – झारखंडच्या धनबाद येथे पुराना बाजार परिसरात असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना झाली असून यात डॉक्टर दांपत्यासह सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. धनबाद येथील पुराना बाजार परिसरात हाजरा रुग्णालय आहे. शुक्रवारी रात्री शॉर्ट सर्किट झाल्याने या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आणि थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप धारण केलं. या घटनेवेळी रुग्ण गाढ झोपेत होते. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धुरामुळे एकच गहजब उडाला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी या आगीतून 9 जणांना वाचवलं आणि जवळच्याच दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. पण, या दुर्घटनेत या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विकास हाजरा आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रेमा हाजरा यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्यासह एकूण सहा जणांचा या आगीत मृत्यू झाला. सुदैवाने या रुग्णालयातील स्वयंपाकघरातून गॅस सिलिंडर आधीच बाहेर काढण्यात आले. अन्यथा ही दुर्घटना आणखी भीषण झाली असती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS