ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मा

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. संघातील स्टार खेळाडू अॅरोन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने याआधीच वनडेमधून निवृत्ती जाही केली होती. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वनडेतून निवृत्ती घेतली होती. भारताविरुद्ध होणऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आधी फिंचने हा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
COMMENTS