Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला

मुंबई : राज्यात विधानसभेचे पडघम वाजल्यानंतर मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. भाजपने 99 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी क

जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा :दादाजी भुसे
बुलडाणा जिल्ह्यात धावली पहिली लालपरी, चोख पोलीस बंदोबस्तात बस आगारातून बाहेर | LOKNews24
माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन

मुंबई : राज्यात विधानसभेचे पडघम वाजल्यानंतर मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. भाजपने 99 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने 38 तर शिंदे यांच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा शेवटच्या टप्प्यापर्यंत तसाच सुरू होता. मात्र हा तिढा सुटल्याचा दावा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलतांना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत 4-5 जागांवर मतभेद होते. मात्र ते मतभेद आता मिटले असून गुरूवारी काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पटोले म्हणाले की, काँग्रेस किती जागांवर लढणार हे तुम्हाला गुरूवारी कळेल. उद्धव ठाकरे आणि आमच्यामधील मतभेद जवळपास संपत आलेले आहेत. 4 ते 5 जागांवर वाद होता, पण तोही आता मिटला आहे, असे पटोलेंनी सांगितले. कार्यकर्ते खोक सरकारला मतदान करणार नाहीत, काँग्रेसला पाठिंबा देणार यावर पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसला देणार्‍या पाठिंब्याबाबत आम्ही बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम करण्यास झालेल्या विलंबाने छोट्या घटक पक्षांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या भागीदारांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना, विरोधीपक्षांचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, डावे पक्ष आणि शेतकरी आणि कामगार पक्ष यांच्यासह इतर छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातच असे झाले तर हरियाणा प्रमाणे काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची स्थिती ही हरियाणाप्रमाणे होईल, असा कडक इशाराच या घटक पक्षांनी दिला आहे.

COMMENTS