Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कामगार वसाहतची वीज थकीत बिलामुळे वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत करण्यात आला होत

अखेर महिला आयोगाकडून गावितांना नोटीस
अखेर निवडक औषधांवरील आयात शुल्क रद्द
अखेर शिंदे सरकार तरले

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कामगार वसाहतची वीज थकीत बिलामुळे वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत करण्यात आला होता. कामगार वसाहतीतील महिलांनी आक्रमक रुप धारण करुन कारखाना प्रशासनाकडे आम्हाला जगू द्यायचे नाही तर विषाची बाटली आणुन द्या आम्ही विष घेतो म्हणजे आमच्या समस्या प्रशासनाला सोडविण्याची गरज पडणार नाही. असा पविञा घेतल्याने. कारखाना प्रशासनाने महावितरणाकडे वीज बील भरणा करुन कामगार वसाहतीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
               डाँ.तनपुरे करखाना प्रशासनाने  महावितरणला बील अदा केल्याने बुधवारी सायंकाळी  सायंकाळी महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. डाँ.तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील कामगार कुटुंबीय अंधारात राहत असल्याने कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी आक्रमक रुप धारण करुन प्रशासनाला आम्हाला जगू द्यायचेच नाही. तर प्रशासनाने आम्हाला विषाची बाटली आणुन द्यावी.आम्ही सर्व कामगार विष घेवुन आमचे जिवन संपवतो अशी भुमिका येथिल कामगाराची पत्नी सविता कराळे यांनी घेतली होती. कामगारांच्या कुटुंबाच्या भुमिकेमुळे प्रशासकीय आधिकारी प्रकाश सैंदाणे यांनी तातडीने हालचाली करून महावितरणला सुरुवातीला सहकार्य करण्याची विनंती करण्याबाबत पत्र पाठविले मात्र महावितरणने त्यास नकार दिला. त्यानंतर प्रशासकाने योग्य ती तजविज करून थकीत वीज बिलाची रक्कम अदा केली. बुधवारी सायंकाळी खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.वीज पुरवठा सुरळीत झाल्याने कामगारांच्या चेहर्‍यावर आनंद ओसडुंन वाहत होता. भविष्यात तनपुरे कारखाना कामगार वसाहतीचा विजेचा प्रश्‍न भेडसावू नये यासाठी कामगार कुटुंबियांशी कामगारांशी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. कारखान्याच कामगार व कुटुंबीय अंधारात राहू नये ही आपली प्रामाणिक भावना असल्याने कामगार बांधवानी सहकार्य कराव असे आवाहन प्रशासक प्रकाश सेंदाणे यांनी केले आहे.

COMMENTS