Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर टीम इंडियाच ठरली चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स !

  भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकविले.  भारताचे हे सलग दुसरे आयसीसी स्प

भारताच्या फिरकीपटू समोर इंग्लंडची शरणागती
आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
विश्‍वविजेता गुकेश डी. याने पंतप्रधान मोदींची घेतली भेट
Image

  भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकविले.  भारताचे हे सलग दुसरे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद आहे.  यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सात गडी गमावून २५१ धावा केल्या.  प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.  रोहितने कर्णधारपदाची खेळी खेळली.  त्याने ७६ धावा करून भारताला संकटातून बाहेर काढले.  भारताची ही आठवी आयसीसी ट्रॉफी आहे.  यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक, १९८५बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप, २००७ आणि २०२४ टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.  या संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला.  भारताने सलग पाच सामने जिंकले.  साखळी गटात भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत पुन्हा किवीजचा पराभव केला.

              चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किवी संघाला ५० षटकांत सात गडी गमावून २५१ धावा करता आल्या.  शेवटच्या पाच षटकांत ५० धावा झाल्या, त्यामुळे न्यूझीलंड हा आकडा गाठू शकला.  यामध्ये सर्वात मोठे योगदान मायकेल ब्रेसवेलचे होते.  त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.  ब्रेसवेलने ४० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी केली.  याशिवाय डॅरेल मिचेल ६३ आणि ग्लेन फिलिप्सने ३४ धावा केल्या.  भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.  त्याचवेळी जडेजाला एक विकेट मिळाली.  शमीने एक बळी घेतला आणि एक खेळाडू धावबाद झाला. या स्पर्धेत प्रथमच प्रतिपक्षी संघ भारताविरूध्द पूर्ण पन्नास षटके खेळला व सर्वबाद झाला नाही. विशेष म्हणजे भारताची गोलंदाजी चांगली झाली. मात्र पाच झेल सोडून भारतीय क्षेत्ररक्षकांनी किवीज फलंदाजांना सावरण्याची संधी दिली. परिणामतः त्यांनी शेवटच्या पाच षटकात ७९ धावा ठोकल्या. त्यामुळेच त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली.

                 भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्वतःची सलग बारावी व संघाची पंधरावी नाणेफेक हरला. त्यानंतर न्यूझीलंडने अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करण्याची नौबत येऊ नये म्हणून स्वतः प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  किवीजची सुरुवातही चांगली झाली.  विल यंग आणि रचिन रवींद्र यांच्यात ५७ धावांची भागीदारी झाली.  यंगला बाद करून वरुण चक्रवर्तीने किवींजना पहिला धक्का दिला.  यानंतर कुलदीपची अप्रतिम कला पहायला मिळाली.  त्याने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनला लागोपाठच्या सलग दोन षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्पर्धेत हे दोन्ही फलंदाज न्यूझीलंडसाठी आधारभूत ठरले आहेत.  या दोन विकेट पडताच किवीज कमकुवत झाले.  जिथे एकेकाळी किवीज सहा पेक्षा जास्त रन रेटने धावा करत होते.  तेथे पहिल्या तीन विकेट केवळ १८ धावांतच गेल्याने धावगती साडेचारच्या जवळ आली.  यंग १५ धावा करून बाद झाला.  त्याचवेळी रचिनने २९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली.  विल्यमसनला ११ धावाच करता आल्या.  त्यानंतर डॅरेल मिचेलने टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्ससह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.  मिचेलने लॅथमसोबत ३३ धावा जोडल्या तर फिलिप्स सोबत ५७ धावांची भागीदारी केली.  लॅथमला जडेजाने आणि फिलिप्सला वरुणने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  लॅथम१४ तर फिलिप्सला ३४ धावा करता आल्या.  दरम्यान, डॅरेल मिचेलने त्याच्या वनडे कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकविले.  तो १०१ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ६३ धावा करून बाद झाला.  शेवटी ब्रेसवेलने आक्रमक फलंदाजी केली.  सँटनर आठ धावा करून धावबाद झाला.

                विजयासाठीच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहितने सुरुवाती पासूनच स्फोटक खेळी खेळली.  त्याने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.  गिल ५० चेंडूत ३१ धावा करून बाद झाला.  यानंतर विराट कोहलीही एक धाव घेऊन निघून गेला.  भारताने एका धावेत दोन विकेट गमावल्या.  रोहितने ४१ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५८ वे अर्धशतक पूर्ण केले.  तो ८३ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७६ धावा करून बाद झाला.  दोन विकेट पडल्यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो रचिन रवींद्रच्या चेंडूवर यष्टीचीत झाला.  यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसोबत ६१ धावांची भागीदारी केली.  श्रेयसचे अर्धशतक हुकले आणि ६२ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.  अक्षर पटेल २९, तर हार्दिक पंड्या १८ धावा करून बाद झाला.  केएल राहुलने ३३ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ३४ धावा केल्या तर रवींद्र जडेजा नऊ धावांवर नाबाद परतला.  जडेजाने चौकार ठोकून भारताला विजयी केले.  न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन, तर जेमिसन आणि रचिन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

                   अशा रितीने भारताने २५ वर्षापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवा बदला घेत सर्वाधिक तीन वेळा हि स्पर्धा जिंकण्याचा उच्चांक गाठला. आयसीसीच्या सर्व प्रकारच्या दहा स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे, तर भारताच्या खात्यात आठ विजेतेपद जमा आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे दुसरे आयसीसी विजेतेपद असून दोन वेळा त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत झाला असून दोन्ही वेळा त्याला ऑस्ट्रेलियाकडूनच मात खावी लागली आहे. या स्पर्धेचे मुख्य संयोजक पाकिस्तान असून पाकिस्तानात अंतिम सामना झाला नाही व ते अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकलेही नाहीत. पण संयोजक म्हणून पारितोषिक वितरणासाठी पोडीयमवर त्यांचा कोणताही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. उलट आयसीसी प्रमुख भारताचे जयेश शहा, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव सैकीया हि भारतीय मंडळी हजर होती. त्यामुळे या स्पर्धेवर व पर्यायाने जागतिक क्रिकेटर भारताचं एकछत्री राज्य असल्याचं सिध्द झालं. हि घटना समस्त भारतीयांचा अभिमान वाढविणारी बाब आहे.

@ डॉ.दत्ता विघावे, क्रिकेट समिक्षक 

COMMENTS