Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर रत्नदीपचे डॉ. भास्कर मोरेंवर दुसरा गुन्हा दाखल

पहिल्या गुन्ह्यात आहेत जामीनावर ; जामखेडकरांच्या रेट्यामुळे प्रशासन हलले

जामखेड ःजामखेड येथील बहुचर्चित रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थींनींनी आर्थिक शारीरिक व

कुकडी आवर्तनासंदर्भात नीलेश लंके यांनी वेधले लक्ष
आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष कुरेशी
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

जामखेड ःजामखेड येथील बहुचर्चित रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थींनींनी आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे गंभीर आरोप केले. डॉ भास्कर मोरेंनी पहिल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन जामीन मिळविला असतांना, आता दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मेडिकल कॉलेजची मुलं-मुली व्यथित होऊन आपल्याला होत असलेला त्रास ओरडुन सांगत होते. मात्र प्रशासनाला कायदेशीर कारवाई करण्यात काय अडचणी येत होत्या कळलंच नाही. जामखेडमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी या अन्याय व छळवणूक होत असलेल्या बाहेरगावच्या मुल-मुलींच्या पाठीशी एकजूटीने ताकद उभी केली. मोर्चा, आंदोलन, उपोषण सुरू केले. तेव्हा वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी दखल घेतली आणि उपोषणस्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकाची नेमणूक करून मूलींच्या तक्रारी ऐकुन घेतल्या. नंतर 7 मार्च रोजी रात्री उशिरा रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरेंच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, डॉ. भास्कर मोरे यांनी फिर्यादीयास कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलावून घेतात. सदर ऑफिसच्या अँटीचेंबरमध्ये फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये करतात. अश्‍लिल चाळे करतात. या कॉलेजच्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत. रत्नदीपचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काँलेजची मान्यता रद्द करण्यासाठी उपोषण सुरू राहणार आहे.

भास्कर आता बस कर! – डॉ भास्कर मोरें यांच्या कॉलेजमधील कारभाराच्या आर्थिक व शारीरिक छळवणूक बाबत अनेक तक्रारी आहेत. याबाबत विद्यापीठाची समिती दि 8 मार्च रोजी 12.30 वा जामखेडला चौकशीसाठी आली होती. यावेळी विद्यापीठाच्या समितीसमोर बोलतांना मूलामूलींना आश्रु अनावर झाले होते. अनेक मूल मूलींना रडत रडत छळवणूकीचा अन्यायाचा पाढा वाचला. या प्रकरणाची विद्यापीठ समितीने गंभीर दखल घेतली असून मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच रत्नदीपच्या अध्यक्षांनी ज्या ज्या प्रकारे विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे पैसे उकळले आहेत. त्याची चौकशी होऊन विद्यापीठ स्तरावर कारवाई करण्यात येईल. या समितीसमोर पांडुरंग भोसले, रमेश आजबे, हवा सरनोबत, आण्णासाहेब सावंत, केदार रसाळ यांनी जामखेडकरांच्या वतीने तीव्र शब्दात डॉ भास्कर मोरेंचा गोड आणि काळ्या कारनामांचा पाढा वाचला. तसेच काँलेज मान्यता रद करण्याच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे सांगितले. डॉ. भास्कर मोरेंवरील आरोपांचा गांभीर्याने विचार होईल असे विद्यापीठ समितीने विद्यार्थी व विद्यार्थीनींना व जामखेडकरांना आश्‍वासन दिले.

COMMENTS