Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर वंचितंच्या बोंबाबोंब आंदोलनाची दखल ः अँड. डॉ. अरुण जाधव

जामखेड ः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या दणक्यामूळे संबधित प्रशासनाने मागण्या मान्य केल्

मृत्यू दाखला हवाय…द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार
खासदार लोखंडे भ्रष्टाचारात ‘अव्वल’ ; अनुदान लाटण्यात ‘पटाईत’
निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या

जामखेड ः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या दणक्यामूळे संबधित प्रशासनाने मागण्या मान्य केल्या आहेत याबाबत जामखेडचे नायब तहसीलदार भोसेकर यांनी लिखित पत्र दिले. असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड अरूण जाधव यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील खर्डा गावातील पीर देवस्थान मंदिराचे डागडुजी होणे बाबत तसेच खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनेगाव प्राथमिक उपआरोग्य केंद्र व शिऊर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये तातडीने डॉक्टर उपलब्ध करून सुविधा देऊन चालू करणे तसेच दिघोळ ते खर्डा रस्त्याचे मजबूतीकरण होणे यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये डिगोळ ते खर्डा जो रस्त्याचे काम अधुरे राहिले आहे ते आठ दिवसांमध्ये चालू करून पूर्ण पण होईल असे लेखी पत्र तहसीलदार साहेब यांनी दिले. खर्डा कानिफनाथ पीर देवस्थान पडझड झालेली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळामध्ये या विषयाला घेऊन व्यापक आंदोलन करण्याचा इशाराही अँड अरूण जाधव यांनी दिला आहे. यावेळी लोकअधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्त्या उमाताई जाधव, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, लोकअधिकार आंदोलन संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक नंदकुमार गाडे,वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे त्याचबरोबर वैजिनाथ केसकर, भीमराव सुरवसे, राजू शिंदे, रजनी आवटे,ऋषिकेश गायकवाड,शहानुर काळे,आलेस शिंदे,सुनील काळे,मोहम्मद मुजावर शेकचंद,मुजावर मुबारक, मुजावर बाबा,मुजावर नजीब, मुजावर हमीद भाई,मुजावर इब्राहम,मुजावर निजाम,मुजावर खलील,मुजावर इस्माईल, मुजावर मन्सूर, सलीम मदारी, मुस्तफा मदारी,फकीर मदारी हुसेन मदारी,जावीद मदारी, मोहम्मद मदारी,असलम मदारी, आबा साळवे असे सर्व बहुसंख्येने उपस्थित होते अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे यांनी दिली.

COMMENTS