Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर शितल गादेकर प्रकरणी ॲड. नरेश मुनोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

धुळे प्रतिनिधी - मुंबई मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शितल गादेकर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर अखेर य

अखेर शिंदे सरकार तरले
अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत
अखेर निवडक औषधांवरील आयात शुल्क रद्द

धुळे प्रतिनिधी – मुंबई मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शितल गादेकर या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर अखेर या प्रकरणातील ॲड. नरेश मुनोत यांच्यासह एमआयडीसी मधील अधिकारी आणि कर्मचारी विरुद्ध काल रात्री उशिरा मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आला असून, याचा सखोल तपास करून शितल गादेकर या महिलेला तिच्या मृत्यूनंतर न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे. तसेच ॲड. नरेश मुनोत यांना काल शितल गादेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सदरची जागा आमच्या नावे करा. अन्यथा, तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिल्यानंतर त्या व्यक्ती विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

2010 साली पतीच्या मृत्यूनंतर शितल गादेकर यांनी कोणतीही तक्रार इतक्या वर्षात न दिल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच इतरही एमआयडीसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पीडित असतील त्यांनी समोर येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

COMMENTS