Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला फिल्म फेअर २०२३ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. मुंबईत गुरूवारी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अने

उन्हाची तीव्रता
संविधानामुळे भेदांच्या श्रृंखला गळून पडल्या ; भारतीयत्व रुजले : डॉ. कुमार सप्तर्षी
बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली

६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. मुंबईत गुरूवारी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत बॉलिवूड स्टार्सचा जलवा पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचा यंदाचा होस्ट सलमान खान होता, तर आयुष्मान खुराना व मनीष पॉल को-होस्ट होते. दरम्यान, आता या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं समोर आली आहेत. यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांचा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जलवा राहिला. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने १० कॅटेगरींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या चित्रपटालाही चार कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांना ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

COMMENTS