इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविद्यालयीन युवकाला ब्लॅकमेल करत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडण
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविद्यालयीन युवकाला ब्लॅकमेल करत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी घेतल्या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्याचा हवलदार हणमंत कृष्णा देवकर (वय 34, रा. इस्लामपूर) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
पिंगळे म्हणाले, 27 ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास हणमंत देवकर आणि आणखी एक कर्मचारी येथील रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रणीला भेटून पुन्हा वस्तीगृहात येत होता. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी त्याला अडवले. आता कोठून आलास? इथे काय करतोयस? अशी विचारणा केली. त्या युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या युवकांकडून त्याचा फोन नंबर घेतला.
दि. 29 ऑक्टोबर रोजी तो युवक ज्या महाविद्यालयात शिकत होता, त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जात हणमंत हवलदार याने त्या युवकास फोन करुन भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेम प्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांकडून 4000 रुपये उसने घेवून हणमंत देवकर याला दिले. तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे, असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकर याने तू तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन असे सांगितले. त्यावर संबंधीत तरुण घाबरला.
देवकर याने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसर्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हीडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हवलदार देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले, शारिरीक संबंधाची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लीप दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधीत तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवलदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवलदार देवकर याला अटक केली. हवलदार देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS