Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदीच्या सक्तीवरून रणकंदन ; मनसेचा 5 जुलैला मोर्चा

मुंबई : राज्यातील त्रिभाषा सूत्राला आणि हिंदी भाषेच्या सक्तीवरून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला असतांनाच दोन्ही ठाकरे बंधूनी पुन्हा एकदा हिंदीं

सोलापूर रेल्वे स्थानकावर ‘जन औषधी केंद्र’
संगमनेरात तब्बल सात तास चालली शिवजयंती मिरवणूक
बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी  सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा Maharashtra Marathi News | Raj Thackeray  Announcement: I also want ...

मुंबई : राज्यातील त्रिभाषा सूत्राला आणि हिंदी भाषेच्या सक्तीवरून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला असतांनाच दोन्ही ठाकरे बंधूनी पुन्हा एकदा हिंदींच्या सक्तीवरून मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे हिंदीच्या सक्तीवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत यावर चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांनी 5 जुलैच्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही, त्यामुळे या मोर्चास सर्व पक्षांनी आपले जोडे बाहेर ठेवून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने राज्यात त्रिसुत्री भाषा धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत इयत्ता पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती. पण विरोधकांच्या विरोधामुळे या निर्णयात फेरबदल करत तिसरी भाषा ही पूर्णतः ऐच्छिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण त्यानंतरही विरोधकांच्या टीकेची धार कमी झाली नाही. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर कडाडून हल्ला चढवत मनसे कोणत्याही स्थितीत हिंदीची सक्ती करू देणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.

हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी राज यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा सल्ला दिला. पण काहीच फायदा झाला नाही. उलट राज ठाकरे यांनी आपला विरोध अधिक कडवा करत हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. दादा भुसेंसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची भूमिका फेटाळून लावली. हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.

COMMENTS