कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील सहकारातील अग्रगन्य असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थ
कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील सहकारातील अग्रगन्य असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले यावेळी त्यांनी सभासदांना 15 टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा केली.
सभेचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देत संस्थेने शेतकर्यांना वाजवी दरातून कीटकनाशक व जनरल इन्शुरन्स उपलब्ध करून दिला असुन इंडियन ऑइल तर्फे संस्थेच्या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोलवर तीन महिन्याकरिता लकी ड्रॉ स्कीम चालू केली असुन संस्था वेळोवेळी सभासदाभिमुख निर्णन घेत असल्याचे सांगितले.. संस्थेचे सचिव भाऊसाहेब येवले यांनी नोटीस वाचन केले तर तुषार गोरड क्षेत्र अधिकारी इफको यांनी माती परीक्षण ननो उत्पादने व सागरी का या पोषक चे महत्व विषद केले व शेतकर्यांना माती परीक्षण मोफत करून देण्याचे जाहीर केले सर्व पात्र सभासदांनी दि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची व्यक्तिगत अपघात संरक्षण विमा पॉलिसी काढण्यात येणार आहे असे व्हा.चेअरमन चंद्रकांत आढाव यांनी सांगितले यावेळी संचालक पोपट नरोडे, दत्तात्रेय सावंत, महेंद्र पाटील, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, संजय वडांगळे, प्रवीण शिंदे, रामनाथ शिंदे, चिञा महाले, शैला आढाव व सभासद उपस्थित होते नंदकुमार भोसले यांनी अकौंटस, संजय नळे यांनी खंंत व गोकुळ नळे यांनी पेट्रोल-डिझेल पंप विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहीती दिली.
COMMENTS