Homeताज्या बातम्यादेश

महिला सहकाऱ्याला केसांना पकडून ओढत नेलं, रस्त्यावरच बेदम मारहाण

गुजरात प्रतिनिधी - गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तिथे 'वन गॅलेक्सी स्पा' बाहेर एका व्यक्तीनं एका महिलेला निर्दयीपण

आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी
झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हकालपट्टी
पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात

गुजरात प्रतिनिधी – गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तिथे ‘वन गॅलेक्सी स्पा’ बाहेर एका व्यक्तीनं एका महिलेला निर्दयीपणे मारहाण केली. 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी बुधवारी (27 सप्टेंबर) या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांनी स्पाचा मालक मोहसीन याच्याविरोधात एफआयआर दाखल करून घेतला आहे. मारहाण करणारी व्यक्ती मोहसीन स्वतः असून, 24 वर्षांची पीडित महिला त्याची बिझनेस पार्टनर आहे. ‘इंडिया टूडे नं दिलेल्या वृत्तानुसार मोहसीन सध्या फरार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहसीन पीडित महिलेला वारंवार मारहाण करताना दिसत आहे. तिनं प्रतिकार करण्याचा आणि स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं तिचे केस ओढले. या झटापटीत त्यानं तिचे कपडेदेखील फाडण्याचा प्रयत्न केला आहे. चार मिनिटांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर दोन दिवस पीडित महिलेनं मोहसीनविरोधात तक्रार दाखल केली नाही. बोडकदेव पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीनं तिच्याशी संपर्क साधला आणि तिचं समुपदेशन केलं. तपासात मोहसीन आणि पीडित महिला स्पामध्ये व्यवसायिक भागीदार असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये झालेल्या जोरदार वादाला हिंसक वळण मिळाल्यानं आरोपीनं महिलेचे केस धरून तिला बेदम मारहाण केली. त्यानं तिला काही अंतरापर्यंत ओढतही नेलं. तीन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सागर शहरात अशाच प्रकारची घटना घडली होती. दुकानं असलेला रस्ता रिकामा करण्यास नकार दिल्यानं तीन पुरुषांनी एका महिलेला रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये ती महिला रस्त्यावर बसलेली असताना एक माणूस तिला ओढून नेताना दिसत आहे. त्यानंतर तिला 12 ते 14 जणांनी घेरलं आणि लाथा मारण्यास सुरुवात केली. जमा झालेले काही लोक तिला मारू नका असं सांगत असूनही एक व्यक्ती तिला मारहाण करत राहतो. पीडित महिला पुरुषांकडे दयेची याचना करताना आणि रडताना व्हिडिओमध्ये दिसत होतं. तिनं विनंती करूनही पुरुषांनी तिला मारहाण करणं सुरूच ठेवलं. याआधी जूनमध्ये, पुण्यात एका पुरुषानं मुलीचा पाठलाग करून तिच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही स्थानिकांनी त्या मुलीची सुटका केली होती. त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, पीडित तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत होती. नंतर अडखळून ती जमिनीवर पडली. आरोपी तिच्यावर वार करणार तोच स्थानिकांनी हातातील वस्तू त्याला फेकून मारल्या आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न

COMMENTS