ओमायक्रॉनच्या भीतीमुळे लसीकरणाचा वेग वाढला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमायक्रॉनच्या भीतीमुळे लसीकरणाचा वेग वाढला

मुंबई : जगभरात ओमायक्रॉनच्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्याला प्राधान्य देतांना दिस

रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर, रेपे रेट कायम
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग
भंगार चोरून नेणारे पाच आरोपी जेरबंद

मुंबई : जगभरात ओमायक्रॉनच्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्याला प्राधान्य देतांना दिसून येत आहे. देशात नागरिकांच्या वाढत्या लसीकरणामुळे लसीकरणांचा वेग वाढला आहे. लसीकरण डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की गेल्या 13 दिवसांत त्याच्या मागच्या 13 दिवसांच्या तुलनेत दुसर्‍या डोसच्या वापरामध्ये जवळपास 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एकूण लसीकरणातही 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूच्या भीतीमुळे गेल्या आठवडाभरात लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ओसरलेला लसीकरणाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या भीतीमुळे लसीकरणाचा वेग वाढत आहे. तसेच आता घरोघरी लसीकरणाचा पाठपुरावा केला जात असल्यामुळे लसीचा दुसरा डोस न घेतलेले लोक लस घेत आहेत, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

COMMENTS