नाशिक : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफ़ ए डी ए) हि सन १९६४ साली स्थापन झालेले राष्ट्रीय फेडरेशन आहे. नुकतीच फेडरेशनच्या महाराष्ट्र वि
नाशिक : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफ़ ए डी ए) हि सन १९६४ साली स्थापन झालेले राष्ट्रीय फेडरेशन आहे. नुकतीच फेडरेशनच्या महाराष्ट्र विभागाची बैठक, एफ़ ए डी ए चेअर पर्सन, महाराष्ट्र राज्य, सचिन महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल रॅडीसन ब्ल्यू नाशिक येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यभरातून एकूण ७० प्रतिष्टीत ऑटोमोबाईल डीलर्स उपस्थित होते. या प्रसंगी अनेक महत्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
बैठकीत मांडले गेलेले मुद्दे :
१. ३१ मार्च २०२० नंतर बीएस ४ ते बीएस ६ या महत्वपूर्ण बदला दरम्यान एफ़ ए डी ए च्या प्रयत्नांमुळे वाहन विक्रेत्यांच्या च्या अनेक अडचणी सोडवण्यात आल्या.
२. फेडरेशन च्या अथक प्रयत्नामुळे दुचाकी व चार चाकी प्रवासी वाहन चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झाले , परंतु व्यावसायिक वाहनांचे आजही ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा नसल्याने वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत तेव्हा अशी सुविधा लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
३. एफ़ ए डी ए ने या बैठकीदरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मल्टिब्रँड ऑउटलेट्स ला जाहीर विरोध केला. आहे व हे आउटलेट बंद करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय तसेच ट्रान्स्पोर्ट कमिशनर ऑफिस कडे जोरदार प्रयत्न सुरु आहेत . केंद्र आणि राज्य शासनाकडे यासाठी जोरदार पाठपुरावा केला जात आहे.
४. सेन्टरल मोटर व्हेईकल ऍक्ट हा सर्व राज्यांसाठी अनिवार्य असला तरी महाराष्ट्रात १०० % अंमलबजावणी होताना दिसत नाही. ह्या विषाया सोबत ’ट्रेड सर्टफिकेट’ मध्ये झालेल्या बदला बाबत सविस्तर मार्गदर्शन आर टी ओ विभागाचे निवृत्त अधिकारी रवींद्र भागवत यांनी केले आणि डीलर्स च्या अनेक प्रश्नाचे निवारण केले .
५. वाहन उत्पादकांमार्फत कडठझ (कखॠक डएउणठखढध ठएॠखडढठAढखजछ झङAढएड) नंबर देण्यासाठी काही ठरावीक एजंसी ची नेमणूक केली आहे. परंतु या एजंसी या मोजक्याच असल्याने डीलर्स ला वेळेत नंबर प्लेट मिळू शकत नाही त्यामुळे वाहन निर्मात्यांनी जास्तीती जास्त एजेन्सी ची नेमून करून कामात सुसुत्रता यावी यासाठी फेडरेशन पाठपुरावा करत आहे.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र कमिटीची नेमणूक करण्यात आली व उत्तर महाराष्ट्र, प्रादेशिक संचालकपदी हेमंत चोपडा यांची नेमणूक झाली. तर उत्तर महाराष्ट्र समिती सदस्य म्हणून दिनेश वराडे, आशीष पाटील, मोहन पवार, सुमीत पटवा, किरण बच्छाव, अक्षय जखेटे यांनी निवड करण्यात आली.
अमर जतीन शेट – केन्द्रीय खजिनदार, सत्यजित तांबे, विधान परीषद आमदार, सचिन महाजन चेअर पर्सन , एफ ए डी ए, महाराष्ट्र्र विभाग, यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एफ ए डी ए चे अनुभवी सल्लागार डिलर भरत भाई सांगवी, गौतम मोदी आणि दिलीप पाटिल यांचा देखील सत्कार करण्यात आला.
एफ़ ए डी एचे उद्दिष्ट्ये :
१. ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कामात सुसुत्रता आणणे.
२. शासनाने नेमलेल्या नियमांच्या चौकटीत राहून व्यवसाय प्रक्रिया पार पाडणे
३. ग्राहकांना विना तक्रार, सुसह्य आणि समाधानकारक खरेदी अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असणे.
४. राज्यभरातील सर्व ऑटोमोबाईल व्यावसायिकांना एकत्रीत करून त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे.
गेल्या ५८-५९ वर्षांपासून फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑटोमोबाईल डीलर्स चे कामातील अडथळे दूर करून कामात सुसूत्रता आणण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र विभागातील अनेक दिग्गज ऑटोमोबाईल व्यावसायिक आमच्या फेडरेशन शी जोडले गेलेले आहे. डीलर्सच्या प्रत्येक प्रश्नांवर उपाय काढण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. या बैठकी दरम्यान विशेष मुद्यांवर चर्चा झाली व त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– सचिन महाजन, चेअर पर्सन , एफ ए डी ए, महाराष्ट्र्र विभाग.
COMMENTS