Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

शेत जमीन नावावर करून देण्यावरून भांडण

राहाता ः राहाता तालुक्यातील कोराळे गावामध्ये 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणपत संभाजी कोळगे वय 80 वर्ष यांना आपल्या वडिलांना शेतजमी

प्रवरेच्या विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड
अखेर राहुरीचे जीर्ण बसस्थानक पाडायला प्रारंभ
अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वृत्तपत्र वितरकांना मदतीचा हात.

राहाता ः राहाता तालुक्यातील कोराळे गावामध्ये 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणपत संभाजी कोळगे वय 80 वर्ष यांना आपल्या वडिलांना शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून मुलगा अनिल कोळगे याने लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद 25 रोजी अमोल विश्‍वनाथ साळवे राहणार कोल्हेवाडी तालुका संगमनेर फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, 24 रोजी सायंकाळी सहा वाजता चे सुमारस गणपत संभाजी कोळगे वय 80 वर्ष राहणार जाधव वस्ती कोराळे, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर. त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे वय 53 वर्ष याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून ते राहत असलेला घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला आहे. असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. राहाता पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल गणपत कोळगे वय 53 वर्ष राहणार जाधव वस्ती कोराळे तालुका राहाता यांच्या विरुद्ध राहता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नं-300/2024 भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोनि काकड हे करीत आहे.

COMMENTS