Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय उद्योगविश्‍वाचा पितामह काळाच्या पडद्याआड !

शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गुरूवारी वरळीतील पारसी स

सातारा जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम
गुगलवरही मिळणार ब्लू टिक
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

मुंबई : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गुरूवारी वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी रतन टाटा यांच्या पार्थिवाला मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या एनसीपीएमध्ये सकाळी 10 ते दुपारी चारपर्यंत ठेवण्यात आले होते. यावेळी रतन टाटा विविध धर्मातील धर्मगुरुंनी अंत्यदर्शन घेतले. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या सर्वांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक मधू भांडारकर, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

राज्यात पाळला एक दिवसाचा दुखवटा
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे राज्यात गुरूवारी शासकीय कार्यालयांवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते. त्याशिवाय मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम देखील आज होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये : राज ठाकरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित रतन टाटा यांचा हयातीतच भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करायला हवा होता, अशी खंत व्यक्त केली आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या 3 दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ’भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवे होते. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली अहाहे.

भारतरत्न देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारीत
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे कार्यकर्तत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत पारीत करण्यात आला. हा प्रस्ताव आता पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची भारत सरकारला विनंती करणारा एक प्रस्तावही संमत करण्यात आला.

COMMENTS