Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-लेकाची आत्महत्या

मुंबई : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोमवारी सकाळी साडे दहाच्या

महिला पोलिसाची पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या.
आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मुंबई : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. बाप लेक स्थानकातील फलाटावरून चालत गेले व समोरून येणार्‍या लोकलखाली झोपले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, वडील आणि मुलगा रेल्वेच्या रुळावर झोपलेले दिसत आहे. दोघेजण अचानक धावत्या लोकलसमोर आल्याने चालकाने लोकल थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र लोकल दोघांच्या अंगावर गेली. मृत बाप-लेक नालासोपारा येथील रहिवासी होते. वडील हरिश मेहता (वय 60 वर्षे)आणि मुलगा जय मेहता (वय30)अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे. रेल्वे भाईंदर स्टेशनमधून रवाना होताच बाप लेकांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिले.दोघांच्या अंगावरून लोकल गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. भाईंदर रेल्वे स्थानाकातून लोकल निघताच दोन जण रुळावर झोपलेले पाहून ट्रेनच्या चालकाने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली चिरडले होते. घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार,आत्महत्या केलेले दोघेही पिता-पुत्र असून ते नालासोपारा येथील रहिवासी आहेत.

COMMENTS