Homeताज्या बातम्यादेश

गुजरात निवडणुकीत सुनेविरोधात सासरे

रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या विरोधात वडिलांकडून काँग्रेस चा प्रचार

जामनगर वृत्तसंस्था - गुजरात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून, या निवडणुकीत सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे जामनगर उत्तरमध्ये रिवाबा जडेज

गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 
घरांच्या विक्रीमध्ये 64 टक्के वाढ
मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल 22 मुलींची फसवणूक

जामनगर वृत्तसंस्था – गुजरात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून, या निवडणुकीत सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे जामनगर उत्तरमध्ये रिवाबा जडेजा. रिवाबा जडेजा या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असून, त्या क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नी आहेत. मात्र त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीला घरातून विरोध होतांना दिसून येत असून, सुनेविरोधात सासरे काँग्रेसचा प्रचार करतांना दिसून येत आहे. रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केला. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत. सुनेला नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी जनतेला केले. यावर आता रिवाबा जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे सासरे आणि नणंद त्या पक्षाचे सदस्य म्हणून प्रचार करत आहेत. कोणतीही समस्या नाही असे रिवाबा यांनी म्हटले आहे. तसेच काही अडचण नाही. एकाच कुटुंबात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असू शकतात. जामनगरच्या जनतेवर माझा विश्‍वास आहे, आम्ही सर्वांगीण विकासावर भर देणार असून, यावेळीही भाजप चांगल्या फरकाने विजयी होईल असे देखील म्हटलं आहे. रिवाबा यांनी म्हटले आहे की, रिवाबा जडेजा यांनी माझ्यासाठी काहीही अवघड नाही. एकाच कुटुंबातील लोक भिन्न विचारसरणीचे आहेत, ही पहिलीच वेळ नाही. जनतेचा पाठिंबा भाजपाला आहे, असे मला वाटते. माझे सासरे आणि नणंद त्या पक्षाचे सदस्य म्हणून प्रचार करत आहेत. कोणतीही समस्या नाही असं म्हटलं आहे. रवींद्र जडेजाने बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, माझे म्हणणे एवढेच आहे की जर तुम्ही नरेंद्र मोदीला बाजूला केले तर गुजरात तुमचा गेला. हे माझे वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे. रवींद्र जडेजाने बाळासाहेबांचा हा जुना व्हिडीओ शेअर करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबा यांच्यासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह यांचे तिकीट कापले आहे.

COMMENTS