Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाप तुरुंगात-आईचा मृत्यू; दोन चिमुरडी बालके अनाथ

सांगली / प्रतिनिधी : बिहार-कर्नाटक प्रेमप्रकरणानंतर जन्माला आलेल्या दोन बालकांच्या पालकत्वाचा विषय आता चर्चेत आला आहे. चोरीच्या गुन्ह्यात बाप त

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती
कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

सांगली / प्रतिनिधी : बिहार-कर्नाटक प्रेमप्रकरणानंतर जन्माला आलेल्या दोन बालकांच्या पालकत्वाचा विषय आता चर्चेत आला आहे. चोरीच्या गुन्ह्यात बाप तुरुंगात गेला. काम करताना आई पडली तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिणामी दोन बालके सध्या अनाथ झाली. खेळायच्या-बागडायच्या वयात या चिमुरड्यांचे आधाराचे छत्रच हरवले. दोघांच्या कुटुंबांचा विरोध झुगारून त्यांनी लग्न केले होते.
सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्‍या मुलीवर आभाळ कोसळले. त्यानंतर कुपवाड सोडून तिने सांगली गाठली. काम करून कसेबसे दोन मुलांना सांभाळू लागली. काही दिवसांपूर्वी तोल जाऊन ती पडली आणि जखमी झाली. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि अखेर तिला मृत्यूने गाठले.
येथील माळी गल्लीीत भाडेकरू म्हणून राहणारी बेबी गजराज वर्मा (वय 32) ही मूळची कर्नाटकची. बिहारहून कामासाठी आलेला तरुण गजराज वर्माशी तिचे प्रेम जमले. त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना काजल (9) ही मुलगी, तर इंद्रनील (2) हा मुलगा. पती गुन्हेगार असल्यामुळे तिला कुपवाड येथील भाड्याचे घर सोडावे लागले. तिने सांगलीतील माळी गल्लीत भाड्याने घर घेतले. मुलांच्या संगोपनासाठी पडेल ते काम ती करू लागली. 26 डिसेंबर 2023 रोजी घरातील कामे करीत असताना ती जागेवरच कोसळली. त्यात ती जखमी झाली. स्थानिकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. पण गेल्या 5 जानेवारी रोजी तिचे निधन झाले. दोन्हीही मुले शेजार्‍यांकडे आहेत. आता त्यांचे पालकत्व कोण घेणार, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना नव्हती. अखेर शेजारी राहणार्‍या अनिता होवाळ यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे या घटनेची माहिती दिली. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकार्‍यांना कल्पना दिली. बाल संगोपनचे माजी अध्यक्ष डॉ. गौतम प्रज्ञासूर्य यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मुलांना सुरक्षित बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून मिरज शासकीय रुग्णालयामध्येे बेवारस असलेल्या बेबी हिच्या मृतदेहावर ठोकळे व यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार केले.

COMMENTS