Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कट मारल्यावरून चौघांकडून पिता पुत्रास फायटरने बेदम मारहाण

पाईपलाईन रोड वरील भिस्तबाग महालाजवळील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः कारला कट मारल्याने कारचालकास गाडी हळू चालव असे म्हटल्याचा राग येऊन चौघांनी शिवीगाळ दमदाटी करूनदोघांना फायटरने मारहाण केल्याच

मविआने अकोले विधानसभा मतदारसंघ माकपला सोडावा
केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
मंथन परीक्षेत नागवडे इंग्रजी माध्यमांचा डंका

अहमदनगर/प्रतिनिधी ः कारला कट मारल्याने कारचालकास गाडी हळू चालव असे म्हटल्याचा राग येऊन चौघांनी शिवीगाळ दमदाटी करूनदोघांना फायटरने मारहाण केल्याची घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड वरील भिस्तबाग महालाजवळ घडली
या बाबतची माहिती अशी कि देवांश जितेंद्र बिहाणी, ( वय 18 वर्षे, रा बंगडीवाला हाऊस, भिस्तबाग महाला जवळ, अ.नगर).हे वडीलसह त्यांच्या आत्याला भेटण्यासाठी मर्सिडिज कंपनीच्या गाड़ी ( क्रमांक एम एच 16 बी एफ 7557 ) या कारमधुन जात असतांना ते भिस्तबाग महालाच्या समोर आले त्यावेळी एक पांढ-या हुंडाई कंपनीच्या व्हर्ना कारने कट मारल्याने बिहणी यांनी कारमधुन आवाज देवून त्या व्हर्ना कारवरील चालकास गाडी हळु चालव असे म्हणाले असता त्या वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार बिहणीच्या कारला आडवी लावुन त्यांना थांबवले त्यावेळी त्या कार मधुन चार इसम नाव गाव माहीत नाही ते खाली उतरले. कार चालवणा-या इसमाने वाईट वाईट शिव्या देण्यास सुरूवात केली. तेव्हा माझे वडील त्यास म्हणाले की, शिव्या देवू नका व्यवस्थीत बोला असे म्हणताच त्यापैकी एका इसमाने त्याच्या खिश्यातुन फायटर काढून देवांश याच्या नाका तोंडावर ओठावर तसेच हातावर मारले. तेव्हा ओठ फुटून त्यातून रक्त येवू लागल्याने जितेंद्र बिहणी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता सर्वानी मिळून दोघांना शिव्या दिल्या व आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडनार नाही असा दम दिला व निघुन जावू लागले तेव्हा तेथे लोक जमा झालेले होते त्यावेळी त्या कारचा नंबर पाहीला असता तो एम एच 42 के 8990 ) असा होता. तेव्हा जमलेल्या लोकांपैकी एकाने त्या चार पैकी दोघाचे नाव सांगीतले असुन राहुल फणसे,( पुर्ण नाव गाव माहीत नाही,) सचिन शिंदे,( रा. वैदुवाडी,मारूती मंदीर शेजारी, अ नगर ) असे सांगीतले .
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी देवांशी जितेंद्र बिहणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल फणसे, ( पुर्ण नाव गाव माहीत नाही,) सचिन शिंदे, ( रा.वैदुवाडी, मारूती मंदीर शेजारी, अहमदनगर ) व दोन अनोळखी इसमांविरूध्द मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS