वैजापूर ः समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे कारचा भीषण अपघात घडला.या अपघात दोन जण गंभीर जखमी झाले.सोमवारी सायंकाळी साडेपाच व

वैजापूर ः समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे कारचा भीषण अपघात घडला.या अपघात दोन जण गंभीर जखमी झाले.सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जांबरगाव ता.वैजापूर पथकर केंद्रजवळ हा अपघात घडला. या संदर्भात अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी करुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश तांबे (54) व त्यांचा मुलगा रोहित तांबे (23) कार क्रमांक एमएच 04 एच यु 4300 यातून वैजापूर च्या दिशेने परतत असताना वाहन चालक रोहित यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरुन दुभाजक तोडून खाली गेली होती.
COMMENTS