अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात

दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक दोन्ही मालवाहू ट्रकच्या चालकांचा जागच्या जागी मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर(Ahmednagar) च्या राहता(Rahata) तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात झाला. दोन ट्रक एकमेकांना समोरासमोरच भिडले आणि अपघात घडला. हा

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू
ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.
धारूर घाटात अपघाताची मलिका सुरुच एकाच वेळी सहा वाहने एकमेकांना धडकली

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर(Ahmednagar) च्या राहता(Rahata) तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात झाला. दोन ट्रक एकमेकांना समोरासमोरच भिडले आणि अपघात घडला. हा अपघात इतका भीषण  होता की दोन्ही ट्रकचा तर चेंदामेंदा झालाच. राहता तालुक्यातील लोणी-कोल्हार मार्गावर दोन मालवाहू ट्रकची जबरदस्त धडक झाली. समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की दोन्ही मालवाहू ट्रकच्या चालकांचाही जागच्या जागी मृत्यू झाला. संतोष राख आणि सुनील जायभाये अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावं आहेत.

COMMENTS