Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

भरचौकात फोडली गाडी, डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न

पुणे ः पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत असतांनाच शुक्रवारी इंदापुरमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीव

नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला
शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

पुणे ः पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत असतांनाच शुक्रवारी इंदापुरमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तहसीलदार पाटील यांची गाडी भरचौकात फोडण्यात आली, हल्लेखोर इथपर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना इंदापूर शहरातील संविधान चौकात शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  तहसीलदार यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. सोबतच हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. या हल्ल्यात शासकीय गाडीची नुकसान झाल असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलिस अलर्ट झाले असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

COMMENTS