Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 15 जण जखमी

वाशीम प्रतिनिधी - विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमा

अपघातात नवजात बाळाचा मृत्यू
नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

वाशीम प्रतिनिधी – विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती.वाशिमच्या कारंजा तालुक्यातील डोनद लोकेशन १७३ जवळ बस आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस महामार्गावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता, की बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. समोरून जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळेच हा अपघात झाला अशी प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS