Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात

तिघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

पुणे प्रतिनिधी - पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाल

Buldhana : बुलढाण्यात भीषण अपघात…ट्रक व बस जळुन खाक (Video)
दुचाकी स्वार गाडी स्लिप होऊन पडला ड्रेनेज मध्ये .
भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी – पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंचरजवळ भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.

COMMENTS